गुन्हे वृत्त

पिंपरीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; महिलेसह 5 जणांना अटक

पुणे पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला जुगार अड्डा चालवत असल्याचं समोर आले असून जायला चौक येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून महिलेसह पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोखरक्कम 3 लाख रुपये आणि पत्त्यांचा कॅट पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाची सूत्र हातात घेतल्यापासून पोलिसांनी अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे.

अनिता परमानंद तखतवानी (वय- 47) रा. जायका चौक, असे जुगार चालवत असलेल्या महिलेचे नाव असून परमानंद चतुरमल तखतवाली (वय- 78), विशाल सांताराम कांबळे (वय- 40) रा. डिलक्स चौक, महेश रामचंद कुरेसा (वय- 42) रा. पिंपरी आणि सचिन जगदीश सौदे (वय- 25) रा.काळेवाडी पुणे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताना अवैद्य धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी अवैद्य धंदे करणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत धाडसत्र सुरू केले आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालाश्री हॉटेल समोरील बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर अनिता तखतवानी ही महिला लपवून जुगार अड्डा चालवत असल्याची खात्रीशीर माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी जुगार चालवणाऱ्या महिलेसह जुगार खेळत असलेल्या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोखरक्कम 3 लाख रुपये आणि पत्त्यांचा कॅट पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार यांच्या पथकाने केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!