गुन्हे वृत्त

पिंपरी-चिंचवडमध्ये ज्वेलर्सची दोन दुकाने फोडली; 20 किलो चांदीसह सोन्याचे दागिने लंपास

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी आणि वाकड परिसरात चोरट्यांनी दोन ज्वेलरीचे दुकान फोडल्याची घटना उघड झाली आहे. यात निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून 20 किलो चांदीचे दागिने, तर वाकडमधील पीआर ज्वेलर्समधून दीड लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोराने सीसीटीव्हीवर स्प्रे मारल्याचे दृश्य फुटेजमधून समोर आले आहे. दरम्यान, निगडी येथील घटनेतील चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात असणाऱ्या पीआर ज्वेलर्सचे अज्ञात चोरट्याने मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून सोने आणि चांदीचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. वाकड येथील घटनेत तीन किलो चांदी आणि पाच ग्रॅम सोने लंपास झाले आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत, निगडी आकुर्डी परिसरात असणाऱ्या नवकार ज्वेलर्स च्या दुकानाचे पहाटे तीन च्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटर उचकटून 20 किलो चांदीवर डल्ला मारला आहे. या घटने प्रकरणी दुकानमालक सुरेंद्र पुनामिया हे तक्रार देत असून दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्हीवर चोरट्याने स्प्रे मारला असून दुकानाच्या आतील सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला आहे. या घटने प्रकरणी निगडी पोलीस चोरट्याच्या शोध घेत आहेत. या दोन्ही घटनांमुळे शहरातील ज्वलरी दुकान रात्री च्या सुमारास सुरक्षित नसल्याच पुन्हा एकदा समोर आले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी ज्वलर्स दुकानदार करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!