ठाणे

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी कल्याण पंचायत समिती इमारत दुरुस्तीची केली पाहणी

कल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा

ठाणे दि. २३ सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून कल्याण पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीचे दुरुस्ती काम सुरु आहे. हे काम वेळेत पूर्ण करून येथील अधिकारी- कर्मचारी यांना सुरक्षित छताखाली काम करता येईल अशी परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी आज कल्याण पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन दुरुस्ती करण्यात येत असलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली.

कल्याण पंचायत समिती कार्यालयाचा काही भाग धोकादायक असून हा भाग बंद करण्यात आलेला आहे. जो भाग जुना आहे मात्र धोकादायक नाही अशा भागाची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा मार्फत दुरुस्ती करण्यात येत आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीचा जुना भाग दुरुस्त करून इमारत बळकट करणे गरजेचे होते.ते काम सध्या सुरु आहे. दरम्यान  श्रीमती लोणे यांनी दुरुस्तीकामा संदर्भात कार्यकारी अभियंता (बांधकाम)  नितीन पालवे, गट विकास अधिकारी श्वेता पालवे आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी उप सभापती रमेश बांगर उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यासह त्यांनी  कल्याण तालुक्याचा दौरा करत विकास कामांबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये वालकस बेहरे भूसंपादना संदर्भात प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत आणि मागील वर्षीच्या पुरात ज्या नागरिकांचे नुकसान झाले होते त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी त्यांनी कल्याण प्रांत आणि तहसीलदार यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे चर्चा केली. त्याचबरोबर कल्याण ग्रामीण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो, या बाबत नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. नागरिकांची ही समस्या दूरव्हावी याकरिता त्यांनी विद्युत महामंडळ अभियंताशी चर्चा केली.

श्रीमती लोणे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यनंतर त्यांनी ताबोडतोब जिल्हयाच्या ग्रामीण भागाचा दौरा केला. सध्याच्या कोव्हीड काळात देखील त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या.  नागरिकांच्या समस्या जाणून समस्यांचे निराकरण करण्यासाठी अग्रेसर राहिल्या. कोव्हीड काळात कोव्हीड केअर सेन्टरवर जाऊन कोरोनाग्रस्थांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हाचा ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणाना नेहमीच त्या  मार्गदर्शन करत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!