ठाणे

शिवसेना नगरसेविका संगीता पाटील यांच्यावतीने  ठाकूरवाडी ( जुनी डोंबिवली )मध्ये समाजकार्य सुरु.  .  

डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना प्रभाग क्र.५४ ठाकूरवाडी ( जुनी डोंबिवली ) येथील नगरसेविका संगीता पाटील व समाजसेवक मुकेश पाटील यांच्या प्रयत्नाने प्रभागात सामजिक कार्य सुरु आहे. कोरोना काळात जनतेला अनधान्य व आवश्यक वस्तूंचे मोफत वाटप केले.प्रभागात कीटकनाशक आणि जंतुनाशक फवारणी करत असल्याने त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाखाप्रमुख धनाजी चौधरी, गणपत गावडे, यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या समाजकार्यात मदत करत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रभागात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.पाटील यांनी पालिका प्रशासनाला मदत करत घरोघरी नागरिकांचे बॉडी टेन्पप्रेचर आणि ऑक्सिजन लेवल तपासणी सुरु केली आहे. नागरिकांना धीर देत सरकारच्या नियमांचे पालन करा, कोरोनाला घाबरू नका, वेळीच उपचार करा, कोरोना बरा होतो असा सल्ला देत असल्याने नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे आभार मानले. प्रत्येक सोसायटीत जंतुनाशक फवारणी, सॅनेटराईज , सोशल डीस्टन्सिंग अश्या नियमांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे असे  नगरसेविका पाटील यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!