महाराष्ट्र

महाराष्ट्रात पान बिडी दुकानात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी – महाराष्ट्र शासन.

मुंबई, 26 सप्टेंबर (संतोष पडवळ) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनलॉकमध्ये अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. अशातच आरोग्य विभागाने एक नवीन आदेश जारी केला आहे. दैनिक लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात सुट्टी सिगारेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हा निर्णय घेण्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या होत्या. मात्र, यावर निर्णय होऊ शकला नव्हता. यासाठी  विधी व कायदा विभागासह सरकारकडे आरोग्य विभागाने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावर कोणताही निर्णय विधी विभागाकडून देण्यात आला नव्हता.

‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) नुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला. पण, आता अनेक पानटपऱ्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे, अनेक राज्यात असा नियम बंधनकारक करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा राज्यात असा निर्णय व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर 24 सप्टेंबरपासूच राज्याती कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

जर सिगारेट किंवा बिडी विकत घ्यायची असेल तर यापुढे संपूर्ण पाकिटच खरेदी करावे लागणार आहे. मुळात सिगारेटच्या आहारी गेलेल्या तरुणाईला व्यसनांपासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!