ठाणे

अंध बांधवांना इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइंडच्या वतीने आर्थिक मदतीचा हात*

अंबरनाथ दि. २८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :   अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील अंध बांधवांना इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइंडच्या वतीने अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी आर्थिक मदतीचा हातभार देत त्यांना मदत करण्यात आली. प्रत्येकी अंध बांधवांना ५०० रुपये प्रमाणे आर्थिक मदत करत शेकडो अंध बांधवांना मदत करण्यात आली. याप्रसंगी सेकेट्ररी प्रिया (डॉली) अग्रवाल, मयूर प्रवीण अमोडे, अविनाश शेलार, स्नेहा कांबळे, हितेश दोशी, तस्लीम यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व अंध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कोरोना संकट काळात सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यापासून इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइंडच्या वतीने अंबरनाथ तालुक्यातील व आजू-बाजूच्या परिसरातील अंध बांधवाना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात करण्यात आली होती. या कार्याची दखल घेत इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष राजेश अग्रवाल व प्रिया (डॉली) अग्रवाल यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!