ठाणे

झोपलेल्या आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी अंबरनाथमध्ये भाजपा महिला मोर्चा तर्फे आक्रोश आंदोलन

अंबरनाथ दि. १२ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :  महिलांवर अत्याचार वाढत चालेले असून झोपलेल्या आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे राज्यभरात आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये ही जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी व अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा अंबरनाथ शहराच्या वतीने शहराध्यक्ष सुजाता दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालय येथे आक्रोश आंदोलन करत तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन आक्रोश व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले-पाटील, दिलीप कणसे, श्रीकांत रेड्डी, राजेश नाडकर, सौ. माधवी सिंग, रीना मोरे, आरती मेहेता, रेखा राजगुरू, वैशाली मंडलिक, आशा देशमुख, सपना लोढ, सुशीला लेखवानी, वंदना पमनानी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!