ठाणे

रखडलेल्या विकास कामासाठी भाजप नगरसेवकांसह आमदारांचा  पालिका मुख्यालयात ठिय्या …

कल्याण ( शंकर जाधव)  :   कल्याण डोंबिवली महापालिकेत विकास कामे मागील तीन वर्षांपासून रखडली आहेत. मागील तीन वर्षांपासून रखडलेली नगरसेवक निधी मधील कामे आणि परिशिष्ट 1 मधील कार्यदेश दिलेली विकास कामे तातडीने सुरू व्हावीत या मागणीसाठी  विरोधी पक्षनेते राहुल दामले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी  मुख्यलयात ठिय्या देत उपोषण छेडले होते या आंदोलनात आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे सहभागी झाले होते.
         कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकास कामासाठी नगरसेवकानाच उपोषनाच्या हत्याराचा आधार घ्यावा लागला आहे.  मागील तीन वर्षात नगरसेवक निधीतून अपेक्षित असलेली विकास कामे कागदावरच राहिली असून मागील सहा महिन्यात करोना उपाययोजनासाठी इतर कामे प्रशासनाकडून प्रलंबित ठेवण्यात आली असून नगरसेवकांच्या सर्व फाईल्स शहर अभियंता स्तरावर प्रलंबित असल्यामुळे नगरसेवक त्रस्त आहेत त्यातच कार्यदेश दिलेली कामे देखील प्रशासनाने रोखली आहेत आता विद्यमान नगरसेवकांची मुदत  11 नोव्हरबर रोजी संपत असून तत्पूर्वी मागील तीन वर्षातील नगरसेवक निधीची कामे तसेच परिशिष्ट 1 मधील कार्यदेश दिलेली कामे मार्गी लावण्याच्या मागणीसाठी 12 ऑक्टोबर पासून उपोषण छेडणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेता राहुल दामले यांनी प्रशासनाला दिला होता मात्र तरीही शहर अभियंता स्तरावरून किंवा प्रशासनाकडून नगरसेवकांच्या शंकाचे निरसन करण्यात आलेले नसल्यामुळे आज सर्वपक्षीय नगरसेवकासाठी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यलयात ठिय्या देत उपोषण सुरू केले .
या आंदोलनात भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे ,विरोधी पक्षनेता राहुल दामले, गटनेता शैलेश धात्रक, नगरसेविका सुनिता पाटील, नगरसेवक वरूण पाटील, विश्वद्विप दया गायकवाड नगरसेवक, संदीप पुराणिक , अभिमन्यू गायकवाड नगरसेवक संदीप गायकर नगरसेविका रेखा चौधरी , खुशबू चौधरी , प्रमिला चौधरी आदी सहभागी झाले होते .प्रशासनाने उपोषणाची दखल घेत तातडीने सकारात्मक निर्णय घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यानी कोरोना काळात विकासकामे झाली नाही हे आम्हीही समजू. पण कोरोनाच्या आधीची मंजूर कामे देखील झालेली नाहीत. फक्त टक्केवारीसाठीच ही कामे रखडवल्याचा गंभीर आरोप केला. भाजपाने केलेल्या आरोपाचे पालिका आयुक्तांनी खंडन केले काही दिवसा पूर्वी विरोधी पक्ष नेता व सर्वच पक्षा गट नेत्यांच्या बैठकीत नगरसेवक स्वेच्छा निधीची कामे व परिशिष्ठ १ च्या वर्क ऑर्डरची कामे निधी उपलब्धते नुसार करून देण्याचे आश्वासन दिले असताना उपोषण करण्याची आवश्यकताच नसल्याची सांगितले.सहा महिन्या पासून कोव्हीडशी सामना करण्यासाठी प्रशासन व्यस्त आहे.पालिकेतील गटार पाय वाटाच्या कामा पेक्षा कोव्हीडशी सामना करणे हे प्राधान्याचे आहे.पालिकेतील इंजिनिअर वर्ग ही कोव्हीडच्या कामात व्यस्त असून विकास कामाच्या फाईल मंजुरीसाठी एक टक्का कमिशन मागितले जात असल्याने फाईली रखडवल्या जात असल्याचा आरोप भोगम असल्याचे सांगित जे कोणी टक्के वारी मागत आहेत त्यांची नावे जाहीर करावी असेही आयुक्तांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!