ठाणे

थकीत मालमत्ताधारकांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई.

ठाणे (13 ऑक्टो, संतोष पडवळ ): ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले असून आज नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील थकीत मालमत्ताधारकांवर कडक कारवाई करून मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षात ज्या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम महापालिकेकडे जमा केलेली नाही, अशा मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर कडक कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी निर्देश दिले आहेत .त्यानुसार ठाणे महापलिकेच्या प्रभागनिहाय सदरची कारवाई करण्यात येत आहे.आज नौपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील बी केबिन- नौपाडा परिसरातील थकीत मालमत्ताधारकांवर उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, उप कर निर्धारक व संकलक अनघा कदम व कर निरीक्षक अनंत मोरे यांनी थकीत मालमत्ताधारकांवर कारवाई करून मालमत्ता सील केली.

नजीकच्या काळात थकीत मालमत्ताधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून ज्यांनी मालमत्ता कर अद्याप पर्यंत जमा केलेला नाही अशा सर्व मालमत्ता धारकांनी कराची देय रक्कम महापालिकेकडे तात्काळ जमा करून जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!