ठाणे

सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर हे अनधिकृत असल्याचा आरोप करत बुधवारी दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. निंबाळकर हे सदर ठिकाणाहून पालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यत चालत येत असताना डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्यांना आंदोलन करताना थांबवत ताब्यात घेतले. परंतु हे आंदोलन सात दिवस सुरु राहणार असून मंदिर ते विभागीय कार्यालय असे अर्धनग्न अवस्थेत चालत जाणार असल्याचे सांगितले.

  सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे अनेक वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर अनधिकृत असल्याचा आरोप करत यावर पालिका प्रशासन का कारवाई करत असा जाब विचारला होता.त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगत निंबाळकर यांनी काही वर्षापूर्वी डोंबिवली विभागीय कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र जोपर्यत कारवाई होत नाही तोपर्यत आंदोलन करतच राहणार असे निंबाळकर म्हणाले.बुधवारी दुपारच्या सुमारास निंबाळकर यांनी पुन्हा एकदा अश्या प्रकारचे आंदोलन केले.मंदिरासमोर आल्यावर त्यांनी अर्धनग्न अवस्थेत चालत जात असताना पोलिसांनी अडविले. मात्र आंदोलन करण्यास का अडकाव करत असा प्रश्न निंबाळकर यानी पोलिसांनी विचारला.पोलिसांनी त्यांचे काहीही न एेकता त त्यांना रिक्षात बसवून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आणले.पुढील सात दिवस आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.यासंदर्भात  पालिकेचे `ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत म्हणाले, सदर मंदिराच्या बांधकामाबाबत कागदपत्र देण्यात यावी असे नगररचना विभागाला कळविण्यात आले असल्याचे निंबाळकर यांना सांगण्यात आले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!