ठाणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून नवरात्री उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन- राजेश नार्वेकर, ठाणे

ठाणे ता 17, संतोष पडवळ –  नवरात्रोत्सवादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा सण साधेपणाने साजरा करण्याच ेआवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता येईल. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे.

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, हातांची स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू. सर्व नागरिकांनी या त्रिसुत्रीचे पालन करावे व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!