कोकण ठाणे

वलप ते कानपोली व गोडआंबे ते वावंजे पी डब्लू डी विभागाच्या अंतर्गत रस्ता तातडीने दुरुस्ती करा.

आगरी कोळी काराडी संघर्ष सामाजिक संस्थेची  मागणी. 

ठाणे  (प्रतिनिधी  मिलिंद जाधव ) : पी डब्लू डी यांच्या विभाग कार्यालय अंतर्गत वलप ते कानपोली व गोडआंबे ते वावंजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  खड्डे रस्त्यावर पडले आहेत.पी डब्लू डी विभाग शिवाय असणाऱ्या पुलावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत  या मार्गावर कामगार वाहातूक रोज मोठ्या प्रमाणात होत आहे. या मार्गावरून पनवेल कडे जाणारे प्रवाशी ,नोकरदार वर्ग,शालेय विदयार्थी नेहमी ये जा करत असतात या रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्या कारणाने सातत्याने सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व सामान्य जनतेच्या मनात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, मोठं मोठ्या खड्यांमुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या समस्येमुळे मनुष्यची जीवित हानी होऊ शकते. हे नाकारता येत नाही.म्हणून आगरी कोळी काराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या  वतीने पनवेल येथील सहाय्यक अभियंता यांना  निवेदन देवून वलप ते कानपोली व गोडआंबे ते वावंजे पी डब्लू डी विभागाच्या अंतर्गत रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्वरित कामाला सुरुवात केली नाही तर आगरी कोळी काराडी संघटना आक्रमक होईल असे ननिवेदन कर्त्यांनी बोलतांना सांगितले. यावेळी आगरी कोळी काराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष  विवेक  भोपी, रवींद्र घरत, पनवेल तालुका सल्लागार , कामोठे शहर अध्यक्ष ऋषभ गोंधळी, वावंजे विभाव प्रमुख प्रमय फडके, नेरे विभाग प्रमुख प्रदिप पाटील,सदस्य अमोल काठे तर आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!