ठाणे

 रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश केला. विशेषतः आगरी समाजातील कार्यकर्ते यांनी आंबेडकरी विचारसरणीचा अंगीकार करित  रिपब्लिकन सेनेची माळ गळ्यात घातली आहे. नवापाडागावदेवी मंदिर येथे वाळकु निवास येथे रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पँथर आनंद नवसागरे,२७ गावे विभागअध्यक्ष अनंत पारदुलेरिपब्लिकन युवा सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष थॉमस शिनगारेउपाध्यक्ष युवा नेते राहुल जाधवरिपब्लिकन सेनेचे भिवंडी शहर प्रमुख सलीम अन्सारीभिवंडी ग्रामीण प्रमुख आकाश मुंडेजेष्ठ नेते राहुल नवसागरेरेल्वे असोसिशनचे दीपक अहिरेदिनेश जोशीउमेश जोशी यांच्या उपस्थितीत  राजाभाऊ जोशी सह स्थानिक भूमिपुत्रांनी तसेच अनेक शेकडो कार्यकत्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश घेतला.यावेळी सोशल डिस्टंसिंगचे निर्बंध पाळण्यात आले            

     यावेळी लालबावटा युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमस्कर यांनी उपस्थितीती दर्शवून तरुणांनी देशाला सावरण्याची गरज असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. राजाभाऊ जोशी यांचे डोंबिवलीत सामाजिक कार्यात उल्लेखनीय असे योगदान आहे.नेहमी गोरगरिबांना मदत करण्यात आणि अन्याय अत्याचाराविधात तसेच समाजाचे   तंटे सोडवून सामाजिक एकोपा ठेवण्यात त्यांचा नेहमी पुढाकार राहिला आहे.राजा जोशी व परेश जोशी यांच्या रिपब्लिकन सेनेच्या प्रवेशामुळे आगरी आणि इतर समाजाच्या शेकडो तरुणांनी त्यांच्यासमवेत प्रवेश घेतला आहे. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना रिपब्लिकन सेनेच्या वाटेवर आणण्याकरिता रिपब्लिकन सेनेचे पँथर आनंद नवसागरे,अनंत पारदुले यांचा महत्वाचा वाटा आहे. रिपब्लिकन सेनेचे पँथर आनंद नवसागरे यांनी आपल्या भाषणात राजाभाऊ जोशी सह प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत येणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना ताकदीने उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले.तसेच राजा भाऊ जोशी यांच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून रिपब्लिकन सेना या प्रवेशाने अधिक बळकट होईल,अशी आशा व्यक्त केली.

अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी व गोरगरिबांचे वंचित ,पीडित,कामगारांचे प्रश्न सोडवणे करिता राजा जोशी यांची रिपब्लिकन सेनेचा नक्कीच मदत होईल असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला.या वेळी अनेक नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.या प्रसंगी राजा जोशी यांच्यासह परेश जोशी,गणेश अहिरे,चिरायू पार दुले,मिथुन आहीरे,कुलदीप चव्हाणपवन पटेलज्ञानेश्वर पवार,अजय पवार,संतोष पवारसागर बेरडीया,सिद्धार्थ जाधव आदी शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश घेतला.या वेळी सोशल डी चे अंतर पाळून कार्यक्रम पार पाडण्यात आला.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी कोरोना मध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली.तमाम कार्यकर्त्यांची फौज घेऊन प्रवेश करणाऱ्याव शेकडो तरुणांच्या मनात घर असलेल्या राजा जोशी यांना रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष या पदावर नियुक्त करण्यात आले.तसेच अनेक कार्यकर्त्यांना विभागीय पदांची जबाबदारी देण्यात आली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!