ठाणे

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या तारखेत बदल

ठाणे दि.2 :भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधी दिनांक १६ नोव्हेंबर २०२० असा घोषित करण्यात आला होता. तथापि, यादिवशी  दिवाळीनिमित्त राज्य शासनाने सुट्टी जाहीर केलेली असल्यामुळे भारत निवडणूक आयोगाने राज्यातील एकत्रीकृत प्रारुन मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत दि.१६ नोव्हेंबर,२०२० ऐवजी दि.१७ नोव्हेंबर,२०२० असा बदल करण्यास मान्यता दिलेली आहे.

याबाबत जिल्हयातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे.तरी संबधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!