ठाणे

कोरोना महामारीमुळे दिवाळीच्या तयार फराळाच्या विक्रीवर परिणाम

दिवाळी फराळ विक्रीत ५० टक्के घट

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   मागील दोन वर्षे आर्थिक मंदी आणि कोरोना संक्रमण याचा फटका घरगुती तयार फराळाला बसला असून डोंबिवलीतील सुमारे ५० ते ६०  टक्के विक्रीत घट होण्याची भीती विक्रेते व्यक्त करीत आहेत.डोंबिवलीत दसरा संपला की परदेशी फराळ पाठवण्याची लगबग सुरू होते. मात्र यंदा त्यालाही फटका बसला आहे. याबाबत दिवाळी फराळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार एकूणच बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल कमी झाली आहे. डोंबिवली भाजी पोळी विक्री करणारे प्रमुख केंद्र असल्याने तयार घरगुती दिवाळी फराळ मोठ्या प्रमाणात विकला जातो.

दिवाळी फराळ परदेशात व देशातील विविध प्रमुख शहरात पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच अमेरिका, लंडन, सिगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, कतार आदी १७६ देशात घरगुती फराळ पाठविले जातात. सध्याची बाजाराची अवस्था लक्षात घेऊन विक्रेत्यांनी ४० ते ५० टक्के माल खरेदी करण्यामध्ये कपात केली आहे. यामुळे येत्या दिवाळीत तयार फराळ खरेदीला फटका बसण्याची चिन्हे आहेत. मालवाहू विमानांची संख्या कमी असल्याने लोड पूर्णपणे जात नाही. दिवाळीच्या आधी फराळ पाठविण्याची सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी आणि आता यावर्षीही फराळ पाठविणाऱ्याची संख्या फारच कमी आहे. पण शेवटच्या दिवशी बऱ्यापैकी लोक पाठवतील अशी खात्री आहे. डोंबिवलीतून सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल फराळ विक्रीतून होत असून त्यासाठी उद्योजक दोन महिने अगोदर याचे नियोजन करीत असतात.

फराळ उद्योजक यावर्षी मंदी असल्याने दिवाळी फराळाला कमी मागणी आहे. पूर्वी यासाठी अधिक कारागीरांची गरज लागायची. परंतु आता कारागिर कमी करावे लागले आहेत. कारागीर कामासाठी विचारपूस करीत असतात पण त्यांनाही काम देता येत नाही. दिवाळी फराळा मोजकाच तयार करावा लागत असल्याने यावर्षी मंदीचे वातावरण दिसत आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!