ठाणे

वेबसिरीजमुळे थिएटर मालकांसमोर आव्हान.. चित्रपट प्रदर्शनासाठी महिनाभराचा अवधी

डोंबिवली ( शंकर जाधव )  : गेले आठ महिने बंद असलेल्या चित्रपट गृहांना ५ नोव्हेंबर पासून चित्रपट प्रदर्शित करण्याचा व्यवसाय करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या निर्णयाचे चित्रपटगृह मालकांनी स्वागत केले असले तरी डिजिटल क्रांतीमुळे वेबसिरीजवर दर्जेदार चित्रपट सहज उपलब्ध असल्याने चित्रपटगृहात कोणते चित्रपट प्रदर्शित करावे हे आव्हान चित्रपटगृह मालकांसामोरे आहे. जोपर्यंत नवे चित्रपट वितरीत होत नाहीत तोपर्यंत चित्रपटगृह सुरू करू शकत नसल्याची माहिती डोंबिवलीतील एका चित्रपटगृह मालकाने दिली. तर पालिकेची दोन्ही नाट्यगृहे सर्व सुविधांसह सज्ज असून शहरातील नाट्य रसिकांना दर्जेदार नाटकांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

डोंबिवलीत गोपी, मधुबन, पूजा, टिळक, मिराज या चित्रपटगृहांतून चित्रपटप्रेमी चित्रपट पाहण्यासाठी नेहमीच गर्दी करतात. चित्रपटगृहे स्टेशनजवळ असल्याने नेहमीच या चित्रपटगृहामध्ये गर्दी दिसून येते. मात्र कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे शासनाने चित्रपटगृहात संक्रमण होऊ नये म्हणून बंदी आणली होती. परंतु आता बंदी मागे घेण्यात आल्याने आता चित्रपटरसिकांची पावले चित्रपटगृहांकडे वळणार आहेत. चित्रपटगुह व्यवस्थापनाने शासनाच्या निर्देशानुसार त्याबाबत तयारी करण्याचे नियोजन केले आहे. याबाबत मधुबन चित्रपटगृहाचे मालक मनीष वीरा यांनी सांगितले कि, शासनाने जरी निर्देश दिले असले तरी आम्हाला महापालिकेकडून चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. अद्याप कोणते चित्रपट दाखवायचे हा जटील प्रश्न आमच्यासामोरे आहे. चित्रपटगृह म्हणजे काही उत्पादन खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण नाही. त्यामुळे वितरकांकडून नवीन चित्रपट आल्यानंतरच ते चित्रपटगृहात दाखविले तर त्याला चित्रपटरसिक वर्ग नक्कीच मिळेल. आणि असे चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अद्याप एक महिन्यांचा कालावधी लागेल.तर शासनाच्या निर्देशानुसार डोंबिवलीतील नाट्यरसिकांना त्यांची आवडती नाटके आता पाहता येणार आहेत. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर सज्ज असून राज्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या प्रेक्षकगृहात नाटके पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे कलामंदिरमधील ध्वनीव्यवस्था आणि वातानुकुलीत यंत्रणा अद्ययावत तंत्रज्ञानाने नव्या स्वरुपात नाट्यरसिकांना आनंद द्विगुणीत करणारा आहे असे ही पालिकेतर्फे सांगण्यात येते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!