मुंबई

रामदास आठवलेंची कोरोनावर मात; कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून साजरा केला आनंद

मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ते रुग्णालयातून आज घरी परतले. त्यांचे अभिनंदन आणि स्वागत करण्यासाठी रिपाइं कार्यकर्त्यांनी घराबाहेर रांगोळी, बँड वाजवत आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 20 फेब्रुवारी रोजी ‘गो कोरोना’चा नारा दिला होता. याच आठवलेंना 27 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली. तेव्हापासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते. 11 दिवसांच्या उपचारानंतर आठवले बरे झाले असून ते घरी परतले आहेत.

रामदास आठवले हे त्यांच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी परतले आहेत. आठवलेंनी कोरोनावर मात केल्याने रिपाइं कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. कार्यकर्त्यांनी घराबाहेर रांगोळी काढत, बँड वाजवत, नाचत, पेढे वाटत आनंद साजरा केला. आठवले हे चळवळीतले एक मोठे नेते आहेत. त्यांना कोरोना झाल्याने कार्यकर्ते चिंतेत होता. मात्र आता त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे मुंबईचे रिपाइं अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!