महाराष्ट्र

व्हाट्सअपवर आक्षेपहार्य व्हिडिओ पोस्ट प्रकरणी एकाला अटक

जालना – व्हाट्सअपवर आक्षेपहार्य व्हिडिओ टाकल्याप्रकरणी कदीम जालना पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा एक व्हिडिओ आझाद मैदानाजवळील एका 29 वर्षीय तरुणाने शेअर केला. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार सेकंदाचा हा व्हिडिओ होता. तक्रारीच्या अनुषंगाने कदीम जालना पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्या तरुणाचा भ्रमणध्वनी ताब्यात घेतला आहे. तसेच जालना तालुक्यातील निरखेडा येथील एका 27 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटकही केली आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे स्वतः लक्ष घालत असून कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हेदेखील या व्हिडिओ प्रकरणी पडसाद उमटू नयेत म्हणून सतर्क आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!