महाराष्ट्र

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दीपावलीनिमित्त शुभेच्छा

  by Aapale Shahar Team नोव्हेंबर 13, 2020 in sliderTicker 0Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. १३ : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील जनतेला दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाची दिवाळी आपण सर्वांनी उत्साहात, आनंदात साजरी करुया. कोविडचा धोका अजूनही टळलेला नसल्याने प्रतिबंधक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन श्री. थोरात यांनी केले आहे.

दीपावलीचा आनंद लुटत असताना सर्वांनीच केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आनंदासह आरोग्य आणि सुरक्षितता जपण्याचे आवाहनही श्री. थोरात यांनी केले आहे. संपूर्ण जगावर, देशावर आणि राज्यावरचे कोविड-19 चे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता आपण या वर्षीची दीपावली प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही श्री. थोरात यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!