महाराष्ट्र

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे सुरू होणार

मुंबई – राज्यातील सर्वधर्मीयांची मंदिरे, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी पुन्हा खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 16 नोव्हेंबरला (सोमवार) दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाबाबतची पूर्ण खबरदारी भाविकांनी प्रार्थनास्थळांवर घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतरही राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी भाजपसह काही संस्था, संघटना सातत्याने करत होत्या. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!