ठाणे

कल्याण – शीळ पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी 21 नोव्हेंबर रोजी रेल्वेकडून मेगाब्लॉक

कल्याण – डोंबिवली स्थानकांदरम्यान अतिरिक्त बसेसची व्यवस्था

ठाणे दि. 18 : शीळ पत्रिपुल गर्डर लौंचिंगसाठी 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी  कल्याण ते डोंबिंवली स्थानका दरम्यान रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान कल्याण ते डोंबिवली येथील प्रवाशांची  अडचण होऊ नये यासाठी जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या  पर्यायी  वाहतुक व्यवस्थेचा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होणार नाही यापद्धतीने दोन स्थानकांदरम्यान अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

         ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवलीच्या महापौर  विनिता राणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, सह संचालक चंद्रकांत पुलकुंडवार वाहतुक उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकांचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासहित संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकांच्या परिवहन विभागाकडून आणि एस.टी. महामंडळकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

      कल्याण – शीळ पत्रिपूलाचे येत्या 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी गर्डर लौंचिंग करण्यात येणार असून अंतिम टप्प्यात आलेले हे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्णत्वास जाणार आहे. यानंतर तात्काळ कल्याण – शीळ पत्रिपुल डिसेंबर अखेर वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी  दिली.

      कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेला जोडणाऱ्या आणि शीळ – कल्याण – भिवंडी रस्त्यावरील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या पत्रीपूल रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या लाँचिग प्रक्रियेकरिता 21 व 22 नोव्हेंबर 2020 रोजी दोन दिवस प्रत्येकी 4 तासांचा मेगाब्लॉक मिळावा यासाठी मागील आठवड्यात खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पाठवपुरावा केला होता. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगसाठी 21 व 22 नोव्हेंबर रोजी दिवसा प्रत्येकी 4 तास असा एकूण 8 तासांचा पहिला मेगाब्लॉक आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी प्रत्येकी 3 तास असा 6 तासांचा मेगाब्लॉकला मध्य रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

       मुंबई ते डोंबिवली तसेच कल्याण ते कर्जत कसारा या मार्गावर रेल्वेसेवा पुर्ववत सुरु राहणार आहे.केवळ कल्याण ते डोंबिवली या स्थानकादरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.परंतु या कामा दरम्यान 250 लोकल रेल्वे सेवा रद्द कराव्या लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी वाहतुकीचे आज झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. सदर समस्या सोडवण्याकरिता करावयाच्या पर्यायी वाहतूक उपाययोजना , त्याचबरोबर गर्डर लौंचिंगचे काम सुरक्षितपणे करण्यासाठी संबंधितांना सुचना करण्यात आल्या.

      कल्याण ते डोंबिवली तसेच डोंबिवली ते कल्याण या मार्गावर नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे – नवी मुंबई  आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त एस.टी. बसेस  आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या वतीने तात्पुरती  स्वरूपात खाजगी वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या कामाच्या दरम्यान सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध ठेवण्याची सूचना डॉ शिंदे यांनी केली.

      या दोन दिवशी १० ते २ या वेळात मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेलातरच घराबाहेर पडावे. तसेच कल्याण व विठ्ठलवाडी बस डेपो येथुन  बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, या बससेवेचा लाभ घ्यावा तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खा. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

        पोलिस, रेल्वे, वाहतुक,आरटीओ तसेच कल्याण डोंबीवली, ठाणे व नवीमुंबई मनपा, एसटी महामंडळ यांनी यादिवशी वाहतुक तसेच बस फेऱ्यांचे नियोजन करावे, एसटी महामंडळाने कल्याण ते ठाणे स्टेशन बसेस उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही  अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!