कोकण

राम मंदिर भाविकांसाठी खुले


सुधागड : कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व तिर्थक्षेत्रे, मंदिरे आणि प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. सुधागड तालुक्यातील श्रीक्षेत्र रामवाडी-पाच्छापूर येथील श्रीराम मंदिर आणि श्रीकानिफनाथ मंदिरही ग्रामस्थांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दर्शनासाठी बंद ठेवले होते. शासनाचा आदेश आणि सुरक्षा नियमांचे पालन करून पंचक्रोशीसह सुधागड तालुक्यात प्रसिद्ध व सर्वश्रुत असलेला यंदाचा ६९ वा श्रीराम जन्मोत्सवही ग्रामस्थांनी अतिशय साधेपणाने साजरा केला. श्रीक्षेत्र रामवाडी हे रस्त्यालगत व किल्ले सुधागड च्या पायथ्याशी असल्याने ट्रेकिंग साठी येणारे पर्यटक आवर्जून या मंदिरांना भेट देतात.


ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिरात व पाच्छापूर तंटामुक्त गाव मोहीम चे अध्यक्ष चंद्रकांत मालोरे यांच्या हस्ते कानिफनाथ मंदिरात पुजाअर्चा, दीपोत्सव,आरती व भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन शासनाचे आभार व्यक्त केल्याची भावना श्रीराम सेवा सामाजिक विकास मंडळ, रामवाडी चे विद्यमान अध्यक्ष राजु सीताराम पातेरे यांनी व्यक्त केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!