ठाणे

पत्रिपुल गर्डर लौंचिंगच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण ,गर्डर 40 मीटर पुढे ढकलण्यात यश

कल्याण : कल्याण डोंबिवलीकर प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून गर्डर लाँचिंगचे पहिल्या टप्प्यातील काम आज यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. विंच केबल पुश श्रू पद्धतीने 76 मीटर पैकी आज 40 मीटरपर्यंत हा गर्डर पुढे ढकलण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे ते काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी 14 तासांचे 4 मेगाब्लॉक घेण्यात आले असून त्यापैकी पहिला 4 तासांचा मेगाब्लॉक आज संपन्न झाला. अत्याधुनिक अशा विंच केबल पुश श्रू पध्दतीने आज नियोजित केलेल्या 40 मीटर अंतरापर्यंत हा गर्डर हलवण्यात यश आले. यासाठी रेल्वेनेही सर्व मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसची वाहतूक बंद
ठेवण्यात आली होती. यापैकी उद्या म्हणजे रविवारी तासांचा दुसरा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्याच्या मेगाब्लॉकदरम्यान उर्वरित 36 मीटर अंतरावर हा
गर्डर ढकलण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!