ठाणे

सौ. दीपा एडविन यांचा राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्षा यांच्या हस्ते प्रवेश…सरचिटणीस पदाची राष्ट्रवादीने दिली जबाबदारी

शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्षा पूनम शेलार यांनी दिली माहिती

अंबरनाथ दि. २५ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराच्या वतीने “पक्ष प्रवेश व नियुक्ती पत्र वाटपाचा” कार्यक्रम शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या आनंदनगर येथील जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात सौ. दिपा एडविन यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांना अंबरनाथ शहराच्या “सरचिटणीस” पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर डोली जाधव (उपाध्यक्ष), स्वाती पवार (सचिव), शहनाज कुरेशी (वॉर्ड अध्यक्ष), लिना साळुंखे (वॉर्ड अध्यक्ष), संगीता सोनावणे (जिल्हा सदस्य) आदींच्या नियुक्त्या करत त्यांना तसे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष दशरथ तिवारे, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे यांच्याहस्ते देण्यात आल्याचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व महिला शहाराध्यक्षा पूनम शेलार यांनी सांगितले.        

        या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, समाजसेविका आशा पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, माजी नगरसेवक वृषाली पाटील, शहनाज शेख, नीलिमा नायडू, विधानसभा उपाध्यक्ष विनोद शेलार, सोशल मीडिया सेल अध्यक्ष मिलिंद मोरे,  युवक सरचिटणीस रवी शिंदे, संजय कराळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!