ठाणे

कल्याण ग्रामीण मध्ये खोणी येथे आगरी-कोळी, वारकरी भवन होणार. – राजू पाटील

आगरी कोळी बोलीला राजाश्रय मिळवुन देण्यासाठी ठाण्यातील आगरी साहित्यिकांची आमदार राजु पाटील यांच्याकडे मागणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : ठाण्याची मुळ बोली आगरी-कोळी भाषा आणि तिचे साहित्य जतन-संवर्धनात पुढाकार घेत असलेले युवा साहित्यिक सर्वेश तरे, भुमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील,चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील,गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसे  आमदार राजु पाटील यांना आगरी-कोळी बोलीला ‘राजाश्रय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली.

आगरी-कोळी बोली,संस्कृती जतना-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, आगरी-कोळी बोलीतील साहित्य निर्मीतीला प्रोत्साहन व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातुन शिबीरे राबविणे,बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्थरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे, नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मिळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे, सोबतच महाराष्ट्र राज्यसरकारचे २०१४ चे भाषे विषय धोरणबोलीभाषेचे संवर्धन करणे, लोकगीत, लोककला,लोककथा संकलन-प्रसिध्द करणे.मराठी    भाषा समृद्द करण्यासाठी बोलींचे शब्दकोश तयार करणे,बोलीचा अभ्यास,संकलन आणि संशोधन करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल असे नमुद असताना त्यावर अंबलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन साहित्यिकांनी दिले.यावेळी आमदार राजु पाटील पाटील यांनी एकंदर महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करु असे सांगीतले. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांकडून आगरी भवन तसेच वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभारण्याची मागणी अनेक जण करत होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकार कडून त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ते स्वखर्चाने खोणी येथे ‘आगरी-कोळी आणि वारकरी’ भवन बांधणार व येत्या १९ डिसेंबर रोजी भुमीपुजन करणार असल्याचे सांगितले . येथे किर्तनकार व वारकऱ्यांसाठी रात्री राहण्यासाठी व्यवस्था असेल. भजन,प्रवचन,किर्तनकार व समाजातील कोणत्याही प्रकारच्या गायकांसाठी एक रेकॅार्डींग स्टुडिओ येथे असेल. तसेच आगरी व विविध बोली भाषेतील साहित्य व एक ग्रंथालय असेल अशी माहिती दिली, तसेच १००% आगरी-कोळी बोली व तिचे साहित्य जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करु असे सांगितले. प्रस्तुत निवेदन भुमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील,ठाण्यातील साहित्यिक मोरेश्वर पाटील,दया नाईक,सर्वेश तरे आणि मर्चंड नेवी अधिकारी गणेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.लवकरच यावर भरीव कार्य करण्याची राजु पाटील यांनी ग्वाही दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!