ठाणे

डोंबिवलीत `आरे` वाचवणार…

 नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन चा प्रयत्न करणार – मनसे आमदार  राजू पाटील

 डोंबिवली ( शंकर जाधव ) :  मनसे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात दावडी, घारीवली, सोनारपाडा, भाल या गावांना लागून असलेल्या व वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या संत श्री सावळाराम महाराज वनश्री टेकडींची  टेकडी वरील निसर्गाचे जतन करू. ह्या साठी नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डनसाठी मनसे प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते.दिलेल्या आश्वासनानुसार मनसे आमदार राजू पाटील यांनी दावडी, घारीवली, सोनारपाडा, भाल या गावांना लागून असलेल्या व वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या संत श्री सावळाराम महाराज वनश्री टेकडींची पाहणी केली.महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पर्यावरण खाते यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू आहे.नाशिकच्या धर्तीवर जसे सीएसआर फंडातून विकासकामं केली गेली, त्या धर्तीवर या टेकड्यांचे जतन सुद्धा करण्याचा प्रयत्न आमदार राजू पाटील यांच्यामार्फत सुरू आहे. आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तेथील निसर्गप्रेमी नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या व त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन सुद्धा आमदार राजू पाटील यांनी दिले.

      डोंबिवली शहर व सभोवतालच्या ग्रामीण पट्ट्यातील बरेचसे निसर्गप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून या भागात सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी, व्यायामासाठी ह्या टेकड्यांच्या वापर करतात. काही निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी सतत येत असतात. डोंबिवली व आजूबाजूच्या परिसराला सिमेंटच्या बांधकामांनी वेढल्याने तशी ही जागा मोकळी प्रदूषणमुक्त आणि मोकळा श्वास घेण्यासाठी ही पर्वणीच आहे. परंत काही भूमाफिया आणि व्यसनी मंडळीमुळे या टेकडीवर अतिक्रमणाचा आणि व्यसनाधीन लोकांनी केलेल्या कचऱ्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढला आहे. जी मंडळी सकाळी व्यायामासाठी या टेकडीवर येतात त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या टेकड्यांवरील वनसंपत्ती जोपासली आहे व जिवापाड जपली आहे. नेहमीच त्याची संगोपन ते सेवावे वृत्तीने करत असतात त्यामुळे ओसाड पडलेल्या त्या टेकडीवर वनराई ही फुलून आलेली आहे. विविध जातीचे,रंगाचे पक्षी पानं-फुलं आता येथे दिसू लागलेली, फुलू लागलेली आहे त्याचबरोबर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे येथील झाडाझुडपांना ही मंडळी खूप मेहनतीने पाणी घालत असतात व त्यांचे संगोपन करत असतात अशा या नैसर्गिक संपत्तीने सदन असलेल्या टेकडीचे संरक्षण झाले पाहिजे. नेहमीच काही अपप्रवृत्ती मुळे येतील वनसंपत्तीला त्या टेकड्यांना आग लावली जाते त्यामुळे वर्षानुवर्ष जोपासलेली ही वनराई जळून खाक होते. पण तितक्याच मेहनतीने ही निसर्ग वेडी मंडळी पुन्हा खूप मेहनत घेऊन त्या वनस्पतींना, झाडे झुडपांना जगवतात. लवकरच या भागाला संरक्षित करण्यासाठी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रयत्न करून, तेथील जे भागीरथी कुंड या नावाने नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करून तसेच सर्व टेकडीवरील झाडाझुडपांना पाणी देता येईल यासाठी पंपाची त्वरित व्यवस्था केली आहे. पाण्याच्या टाक्या बसवून पाईपलाईन करून कमीत कमी मेहनतीने जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. तसेच जी व्यसनी मंडळी आहेत त्यांच्याकडून जो काही -हास होत आहे त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची मदत वेळेस महाराष्ट्र सैनिकांच्या मदतीने लवकरात लवकर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही नैसर्गिक देण म्हणजे आपल्या डोंबिवलीकरांसाठी आरे जंगल आहे, आपला श्‍वास आहे आणि ते आपल्याला वाचवायचे आहे, आणि मी पूर्ण ताकतीनिशी ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले. पाहणीचा सुरुवात आमदारांच्या हस्ते भागीरथी कुंडा  जवळ पवित्र तुळशीचे रोप लावून झाली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!