ठाणे

अनुग्रह आश्रमात अनाथ मुलांसोबत जागतिक अपंग दिन साजरा*

साध्वी अपंग कल्याणकारी संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला जागतिक अपंग दिन**अनाथ मुलांना महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत दाखले देणार – गौतम बचुटे

अंबरनाथ दि. ०३ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आज साध्वी अपंग कल्याणकारी संस्था अंबरनाथ यांच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील फणसीपाडा गाव येथील अनुग्रह बाल आश्रमातील अनाथ मुलांना “अन्नदान” व धनंजय देव यांच्या “ज्यांसी अपंगिता नाही, त्यांसी धरी जो हृदयी” या पथनाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन साध्वी अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश दादाभाऊ आल्हाट यांनी केले होते. दरम्यान गिनीज बुक मध्ये नोंद असणारे टीव्ही सिरीयलचे सुप्रसिद्ध कलाकार बाळू कुमावत यांनी विविध प्रकारे कला सादर करत अनाथ मुलांची मने जिंकली आणि कलाकार अशोक चव्हाण यांनी मिथुन चक्रवर्ती व मनोजकुमार आदींचे आवाज काढत आपली कला सादर केली. तसेच अनाथ आश्रमातील मुलांचे वय अधिवास दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला अशाप्रकारे विविध दाखले हे महा-ई-सेवा केंद्र अंबरनाथचे संचालक गौतम बचुटे हे मोफत काढून देणार असल्याचे गौतम बचुटे यांनी सांगितले.       

   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक किशोर सोरखांदे, भालचंद्र धोंडे उपस्थित होते, तर याप्रसंगी सुनील अहिरे, प्रफुल थोरात, साध्वी अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश दादाभाऊ आल्हाट, महा-ई-सेवा केंद्राचे संचालक गौतम बचुटे, सुनिता अडसुळे, अनुग्रह अनाथ आश्रम शाळेच्या प्रमुख लीला पॉल, शिक्षिका वेरोनिका खंडागळे, सुजाता सोनावणे, रूथ लोखंडे, मुकेश जाधव, सुनील गांगुर्डे, निलेश गायकवाड, अशोक चव्हाण, काशिनाथ खाकी, उमेश गोपाळ आल्हाट, जगदीश पवार, रमेश जाधव, नरेश कलवार, विजय नायडू, पप्पू अभंगे, समीर शेख यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!