ठाणे

गरिबांना अल्पोहार देऊन भाजप नगरसेवक महेश पाटील यांचा वाढदिवस साजरा

डोंबिवली ( शंकर जाधव  ) :  भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पल्लवी पाटील, डॉ.सुनीता पाटील, सुजित नलावडे, सिकंदर मकानी,नितीन कोळी, दत्ता वाठोरे यांच्यासह अनेकांनी गरिबांना अल्पोहार दिला. दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असतात. मैत्री चॅरीटेबल ट्रस्टमध्ये फळे वाटप, पालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात फळे वाटप, स्टेशनपरिसरात रिक्षाचालकांना जेवण तसेच मानव चॅरीटेबल ट्रस्टला एक बेड आणि डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडी येथील गुरुकृपा विकास संस्था या पालिकेच्या निवारा केंद्र येथे अल्पोहार देण्यात आला. भाजप नगरसेवक महेश पाटील यांच्या वाढदिवसदिनी मोठ्या गाजावाजा न करता गरिबांना अन्नदान केल्यास समाधान मिळते असे समाजसेवक सुजित नलावडे यांनी यावेळी सांगितले.

तर वृद्धाश्रमात भेट दिल्यावर ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक पाटील यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीस आशीर्वाद दिला.डॉ.सुनीता पाटील म्हणाल्या, महेश पाटील हे सदैव समाजसेवक करत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास नेहमी पुढे असतात.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!