ठाणे

महालक्ष्मीनगरमध्ये सदामामांनी स्व:खर्चाने पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचा केला शुभारंभ

१२५ मीटर पाण्याची लाईन टाकल्याने महालक्ष्मी चाळीतील नागरिकांचा प्रश्न लागला मार्गी

सदामामा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले काम; नागरिकांनी मानले

आभार

अंबरनाथ दि. ०७ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्रं. ४३ महालक्ष्मीनगर मधील दुर्गा माता किराणा दुकाना समोरील गल्लीतील रस्त्याची खूपच दुरवस्था झालेली असून त्यामुळे येथील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. ही बाब सदामामा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक सदाशिव (मामा) पाटील व समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर, लागलीच सदर ठिकाणी १२५ मीटरपर्यंत स्व:खर्चाने पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांच्याहस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर महालक्ष्मीनगर मधील महालक्ष्मी चाळीत गेल्या १५ वर्षांपासून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत होता, ही बाब येथील नागरिकांनी सदाशिव (मामा) पाटील व समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, लागलीच सदर ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत येथील नागरिकांना पाण्याचा होणारा त्रास तातडीने सोडविण्यासाठी मजीप्राकडून दोन इंचाची १२५ मीटरपर्यंत पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून देण्यात आली व या कामाचा देखील शुभारंभ समाजसेविका आशा पाटील यांच्याहस्ते करत काम पुर्ण करून देण्यात आलेले आहे.  

         

दुर्गा माता किराणा दुकाना समोरील गल्लीतील नागरिकांना रस्त्यामुळे होणारा त्रास दूर झाल्याने व महालक्ष्मी चाळीतील नागरिकांना पाण्याचा होणारा त्रासाचा तोडगा काढून प्रश्न मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी सदाशिव (मामा) पाटील व समाजसेविका आशा सदाशिव पाटील यांचे आभार मानले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!