ठाणे

विकासकामांचे नियोजन नसल्याने दिव्यात वाहतूक कोंडीची समस्या – निलेश पाटील

ठाणे:- पालिकेमार्फत दिव्यात सुरू असणाऱ्या विकासकामांचे नियोजन नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे मत भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केला आहे.

दिव्यात मागील वर्षभरापासून विकासकामांसाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे.मात्र योग्य नियोजन नसल्याने व नागरिकांच्या प्रश्नाची जाण सत्ताधारी व पालिकेला नसल्याने अनेक ठिकाणी खोदकाम मुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची गैरसोय होत असल्याकडे निलेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

दिवा शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन याठिकाणी नियोजन करणे गरजेचे होते मात्र पर्यायी व्यवस्था न करता ,नियोजना अभावी मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्याने दिवा शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडी ला सामोरे जावे लागत असल्याकडे निलेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

दिवा पूर्व पश्चिम उड्डाणपुलाचे कामास झालेला उशीर हे पालिकेतील सत्ताधारी यांचे अपयश आहे असे निलेश पाटील यांनी म्हटले असून दिवा शहरात पर्यायी मार्गांची असणारी कमतरता लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होणार नाही अशा पध्दतीने कामाचे नियोजन प्रशासनाने करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!