ठाणे

खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा. संघटनेचा तृतीय दिनदर्शिका सोहळा संपन्न

ठाणे, ता २१, संतोष पडवळ : खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा ही संघटना गेले कित्येक वर्षे दिवा शहरात सामाजिक ,सांस्कृतिक , आरोग्य शिबीर , आणि समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असतात. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक लोकांना मदत केली आहे. रविवार दिनांक डिसेंबर रोजी 2020 रोजी दुपारी ठीक दोन वाजता खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर यांचा तृतीय दिनदर्शिका सोहळासमस्त खेड तालुका वासीय व दिवा वासीयांच्या उपस्थित संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव ओळखून सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिका सोहळा पार पडला. दिनदर्शिका सोहळ्यासाठी एस. इ.हॉस्पिटलचे श्री. डॉक्टर महाजन, विभाग प्रमुख दिवा श्री.उमेश भगत , विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सचिन पाटील ,तन्वी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती पाटील , पाटील बाबा प्रतिष्ठान चे नवनीत पाटील तमाम खेड तालुक्याच्या माता-भगिनी आणि समस्त खेड तालुका कोकण रहिवासी मंचाचे पदाधिकारी आणि सक्रिय सभासद उपस्थित होते.तसेच नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत समाज विकास फाउंडेशन चे जयसिंग कांबळे, डि.के. खरात जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष समीर चव्हाण व राजेंद्र आंब्रे,गणेश पाडा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अजित माने, उपस्थित होते

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!