नवी मुंबई

धक्कादायक ! महिलेवर लोकलमध्ये अत्याचार करून रेल्वे पटरीवर फेकले.

नवी मुंबई, ता २५, : वाशी रेल्वे स्टेशन जवळ ऐक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे, एका महिलेवर लोकलमध्ये अत्याचार करण्यात आले, यानंतर तिला रुळावर फेकून देण्यात आले. सुदैवाने आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे, वाशी खाडी पुलाजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेतील आरोपींना शोधून काढणे हे पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे लोकलच्या मोटरमनला ही महिला पहाटे जखमी अवस्थेत रुळानजीक दिसून आली.

नवी मुंबईतील वाशी खाडी पुलाजवळ अज्ञाताने तरुणीवर अत्याचार करून लोकल मधून फेकून दिले आहे. मंगळवारी पीडिता रुळावर जखमी अवस्थेत आढळून आल्यानतंर हा प्रकार समोर आला. ही तरुणी नवी मुंबईत राहते आणि तिथेच घरकाम करते. शनिवारी टिटवाळ्याला तिच्या आई वडिलांच्या घरी गेली होती. तिथून ती रविवारी थेट पवईला गेली.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका मोटरमनला पीडिता जखमी अवस्थेत रुळावर आढळली. त्यानंतर स्टेशनमास्तरांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पीडितेची प्रकृती सध्या स्थीर आहे. मात्र, अजूनही पीडिता बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!