ठाणे

अनधिकृत बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाची वंचित बहुजन आघाडीकडून दखल

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकका हद्दीत अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. अनधिकृत बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर सुरु केलेल्या आंदोलनाला ४८ दिवस झाले.या आंदोलनाकडे प्रशासनाने कानाडोळा केला असता तरी या आंदोलनाची वंचित बहुजन आघाडीने दाखल घेतली.सोमवारी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर निंबाळकर यांचे आंदोलन सुरु असताना वंचित बहुजन आघाडीने त्यांची भेट घेतली. 

कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे,डोंबिवली अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी निंबाळकर यांना आंदोलनात आमचा पाठिंबा असल्याचे सांगितले. निंबाळकर यांचे आंदोलन हे जनतेसाठी असून पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे सुरु आहे जे जनतेला माहित आहे. पालिका प्रशासन अनधिकृत बांधकामांकडे लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ताचे आंदोलन हे योग्यच आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!