ठाणे

भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांच्यावतीने विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीर..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : येथील जुनी डोंबिवलीत भाजप आणि कल्याण डोंबिवली महापालिका ठाकुरवाडी नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने   विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा याकरिता कल्याण डोंबिवली महापालिकेने काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. महापालिकेच्या वतीने कल्याण डोंबिवली परिसरात दाट वस्तीच्या ठिकाणी  तपासणी केंद्राची सोय करण्यात येत आहे.जुनी डोंबिवली येथील भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णा पाटील या युवकाने  महत्त्वाचे योगदान दिले आहे.

या तपासणी शिबिराच्या आयोजनाबाबत कृष्णा पाटील म्हणाले कि, स्थानिक पातळीवर करोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी महापालिकेच्या सहकार्याने तपासणी शिबीर आयोजित केले आहे.काही तपासणी केंद्र दूर असल्याने आणि लोकांमध्यल्या भितीच्या  वातावरणामुळे तपासणी केंद्राची सोय येथे करण्यात आली.जुनी डोंबिवलीतील महापालिका शाळेत अँटीजन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट मोफत उपलब्ध करण्यात आली.

या वैद्यकीय सुविधेचा लाभ अनेक  नागरिकांनी घेतला.दरम्यान कृष्णा पाटील यांनी कोरोना काळात नागरिकांना आवश्यक अन्नधान्य वाटप,आरोग्य शिबितर,जंतूनाशक फवारणी,जनजागृती केली होती.प्रभागातील विकास कामांमध्ये पाटील यांनी स्वतःला झोकून दिले आहे. भाजपला पाटील यांच्या रूपाने एक नवीन चेहरा असून डोंबिवलीत पाटील यांच्या समाजकार्याचे कौतुक होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!