ठाणे

लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आल्याने तो रिक्षातून विकतोय भाजी…

 डोंबिवली ( शंकर जाधव )  : सुरळीत सुरु असलेले जीवन अचानक कोरोनामुळे विस्कळीत झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय ठप्प झाले. अशा परिस्थितीत हार न मानता पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची हिम्मत ठेवून एका रिक्षा चालकाने समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मुळातच डोंबिवली शहराची ओळख  चाकारमान्यांची  नागरी अशी आहे. अनेक चाकरमानी  रेल्वेने प्रवास करून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत कामासाठी जातात.  तर डोंबिवली रेल्वे  स्थानकापर्यंत जाण्यासाठी अनेक चाकरमानी रिक्षेचा पर्याय स्वीकारत होते. मात्र सध्यस्थितीत कोरोनामुळे एका रिक्षेत दोन याप्रमाणे प्रवासी घेण्यास परवानगी असून रिक्षा चालकांना शेअर पद्धतीने रिक्षा भाडे घेणे परवडत नसल्याने रिक्षेतून भाजी विक्री करण्याचा निर्णय एका रिक्षा चालकाने घेतला आहे.या रिक्षाचालकाच्या मदतीला त्याच्याच मित्र मनोज वाघमारे हा धावून आला आहे.  

  डोंबिवली शहरात सुमारे २० हजारच्या आसपास रिक्षा धावतात. या रिक्षा मीटरवर धावत नसल्या तरी शेअर रिक्षेने प्रवास करणे चाकरमान्यांना परवडते. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारने तालेबंदीचा निर्णय घेतला. या काळात रिक्षा चालकांनी देखील रिक्षा रस्त्यावर काढल्या नाहीत. त्यामुळे रिक्षा चालकांची परिस्थिती अंत्यंत बिकट झाली. मात्र तालेबंडीचे नियम शिथिल झाल्यानंतर रिक्षाचालकांना एकावेळी केवळ दोनच प्रवासी घेऊन रिक्षा चालवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर काही रिक्षा चालकांनी तीन जणांचे भाडे दोन जणांमध्ये वाटून त रिक्षा चालक हे घेतले. त्यानंतर प्रवासानी देखील आमचा पगार वाढला नसल्याचे सांगत वाढलेली भाडे किंमत देण्यास नकार दिला. त्यामुळे रिक्षा चालकांना परवडत नसल्याचे सांगत रिक्षाचालक शंकर जगताप यांनी आपल्या रीक्षेतुनच भाजीचा व्यवसाय सुरु केला आहे . डोंबिवली पूर्वेकडील  टाटा-पिसवली येथे  राहणाऱ्या शंकर जगताप या रिक्षा चालकाने भाजी विकून घर चालवत असल्याचे सांगितले. कोणत्याही परिस्थितीत हर मानायची नाही असे या रिक्षाचालकाने ठरवले असून हा अनोखा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे. रोज सायंकाळी  डोंबिवलीतील विविध ठिकाणी जगताप भाजी विकत असल्याचे दिसून येते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!