ठाणे

अंबरनाथमधील वनविभागाच्या नोंदींचा प्रश्न निकाली; अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा : आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यांना यश


अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :   अंबरनाथ पूर्वेकडील कानसई परिसरातील शिवगंगा नगर, मोहनपुरम या निवासी जागांवर वनविभागाच्या नोंदी टाकल्या गेल्यानं येथील रहिवासी हवालदिल झाले होते. यासंदर्भात अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अनेक वर्षांच्या केलेल्या पाठपुराव्यानंतर या नोंदी हटणार असून या जागा आता सोसायट्यांच्या नावावर होणार आहेत. त्यामुळे येथील रहिवाश्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.       

 या परिसरात १९८० च्या आधीपासून नागरी वस्ती असून मध्यंतरीच्या काळात अचानकपणे या मानवी वस्ती असलेल्या भागावर वनविभागाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे या भागात राहणारे हजारो नागरिक हवालदिल झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर हे यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यानंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या जागांवरील वनविभागाच्या नोंदी हटविण्याचे आदेश दिले आहेत. उल्हासनगरचे प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी वनविभागाच्या नोंदी कमी केल्यासंदर्भातील दाखला आमदार डॉ. बालाजी किणीकर व गृहनिर्माण संस्थेतील रहिवाश्यांकडे सुपूर्द केला. यामुळे मोहनपुरम व देव प्रकाश गार्डन मधील सुमारे ५०० हुन अधिक सदनिका धारकांना दिलासा मिळणार आहे.दरम्यान, मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी सांगितले की, यामागे आमदार राजू पाटील यांचा पाठपुरावा असल्याचं म्हटलंय. मात्र आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कागदपत्रे बोलतात असे सांगितले.       

      याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख संदिप मांजरेकर, विभागप्रमुख पद्माकर दिघे, उपविभाग प्रमुख ज्ञानधर मिश्रा, स्थानिक शाखाप्रमुख सुरेश चव्हाण, नगरसेवक रवींद्र पाटील, ऍड.निखिल वाळेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत भोईर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!