ठाणे

भाजपा अंबरनाथ शहर आयोजित “भव्य रोजगार” मेळाव्याला तरुणांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबरनाथ दि. १० (नवाज अब्दुलसत्तार वणू)   :  भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर तर्फे आयोजित “भव्य रोजगार” मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अंबरनाथ व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास २५०० उमेदवारांनी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन केले व मेलद्वारे देखील आपली नावे नोंद केली. कोरोना महामारी काळात लॉकडाऊनमुळे खूप प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या व बेरोजगारी वाढली. बेरोजगारीचा प्रश्न लक्षात घेत भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रोझलीन फर्नांडिस यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.             

  यावेळी माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शिक्षक परिषदेची कार्यकारिणी जाहीर करत शिक्षक संघटनेची मुहूर्तमेढ रोवली तसेच ओरीसा प्रांतिक आघाडीचे देखील नियुक्ती प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी केली. भाजपा कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेत रोजगार मेळावा यशस्वी केला.       

   याप्रसंगी समाजसेवक विश्वजीत करंजुले-पाटील, संघटन सरचिटणीस दिलीप कणसे, उपाध्यक्ष दीपक कोतेकर, डॉ मनोज कंदोई, रोहित महाडिक,भरत फुलोरे, रोहिणी भोईर, अनिता भोईर, अजित खरात, सुधाकर जाधव, महेश मोरे, प्रभाकर भोईर, राजेंद्र कुलकर्णी, मनेष गुंजाळ, नितीन परब, दुर्वेश राणा, रणविजय यादव, प्रदीप गुप्ता, अतिष पाटील, विनायक जोशी, लक्ष्मण पंत, राजेश सिंह,राजु गायकवाड,सुजाता गायकवाड संतोष शिंदे, संतोष वंदाल, पंकज चोळेकर, आशिष साळवे, मधुर अंबोकर, रूपाली लठ्ठे, उज्वला कबरे, सुनिता लाड, पुजा रणदिवे, सुनिता लयाला, स्वप्नाली शिंदे, दिपाली गुंजाळ, शारदा यादव, ज्योती यादव, ज्योती डोंगरे, मुरूस्वामी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!