मुंबई

संरक्षण कमी केल्याच्या निषेधार्थ आठवले गट आक्रमक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या संरक्षणात कपात करण्यात निर्णय महाविकास आघाडी सरकारने जाणिवपूर्वक व जातीय द्वेषभावनेतून केला असून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निर्णयाविरोधात निषेध करीत राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.याबाबत राज्यभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून ठिकठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत. याप्रकरणी आरपीआय गुजराती समाजाचे मुंबई अध्यक्ष जतीन भुत्ता, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर,युवा शहराध्यक्ष राजू तोरणे, मागाठाणे तालुकाध्यक्ष अशोक कांबळे, दहिसर तालुकाध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी निषेध व्यक्त करून राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.


दरम्यान गौतम सोनवणे म्हणाले की दलित, शोषित, वंचित समाजाच्या प्रश्नांसाठी ना. रामदास आठवले हे पायाला भिंगरी लावून अहोरात्र फिरत असतात.दोन वर्षापूर्वी अंबरनाथ येथे एका कार्यक्रमात त्यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ना. आठवले यांना सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र केंद्रातील मंत्री असताना ही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने जाणिवपूर्वक राजकीय सूडबुध्दीने हा निर्णय घेतला आहे. सरकारने त्वरित हा निर्णय मागे घ्यावा व रामदास आठवलेंची सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी गौतम सोनवणे यांनी केली आहे. राज्याच्या राज्यमंत्र्याला जास्त सुरक्षा व केंद्रीय राज्यमंत्र्यांना कमी सुरक्षा हे कोणते सुरक्षेचे धोरण राज्य सरकारने व मुंबई पोलिसांनी अंगीकारले आहे, असा प्रश्न गौतम सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!