ठाणे

अडथळ्यांची शर्यत करायची आणि पुन्हा आपली गती मोजायची ही रेस निदान जनतेच्या हिताच्या कामाच्या बाबतीत करू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कल्याण :- कल्याणच्या पत्रीपुलाच्या निर्मितीसाठी रेल्वेने तत्काळ काही निर्णय घेऊन जी गतिमानता दाखविली अशीच गतिमानता केंद्राच्या अनेक संस्था घेतला पाहिजेत . केंद्राच्या अनेक संस्थाकडे राज्याची अनेक कामे अडकून राहिलेली आहेत . मिठागर जमिनीवरील कांजूरची शेडच्या परवानगी बाबत केंद्राच्या संस्था कडून ज्या काही अडथळे येत आहेत याचे उदाहरण देत अडथळ्यांची शर्यत करायची आणि पुन्हा आपली गती मोजायची ही रेस निदान जनतेच्या हिताच्या कामाच्या बाबतीत करू नये अशा शेलकी शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नविन पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईनद्वारे करण्यात या प्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.


कल्याणातील बहु चर्चित नव्याने उभारण्यात आलेला पत्री पुल अर्थातच नविन आई तिसाईदेवी उड्डाणपूलाच्या लोकार्पण शिलेचे उदघाटन ऑन लाईन पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करीत धुमधडाक्यात लोकार्पण करण्यात आले.


या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राज शिष्ठाचार मंत्री, आदित्य ठाकरे व नगरविकास मंत्री व पालक मंत्री एकनाथ ठाकरे ,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल का? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहीजे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे कान उपटले. विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे असून कोणत्याही पातळीवर आपल्याला तू तू मे मे होता कामा नये अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


तर नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम सुरू असल्याने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडत आनंद व्यक्त केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!