ठाणे

दिव्यातील रखडलेल्या विकास कामांचा पालिका आयुक्तांनी आढावा घ्यावा ! भाजपचे ठाणे उपाध्यक्ष निलेश पाटील यांची मागणी

दिवा:-दिवा शहरात पालिकेच्या माध्यमातून होत असणाऱ्या विविध प्रकारच्या विकास कामांचा आढावा पालिका आयुक्तांनी घ्यावा, अनेक ठिकाणी विकास कामे रखडलेल्या स्थितीत आहेत याबाबत आयुक्तांनी आढावा घेतल्यास कामे मार्गी लागतील असे भाजपचे ठाणे उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी म्हटले आहे.

दिवा शहरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू असून त्यातील अनेक कामे ही कागदावर असून रखडलेल्या स्थितीत आहेत. विकासकामे रखडल्याने याचा फटका नागरिकांना बसत असून अर्धवट स्थितीत असणाऱ्या कामाची आयुक्तांनी पाहणी करावी अशी मागणी निलेश पाटील यांनी केली आहे.

मागील चार वर्षांत दिव्यात कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात दिवा शहरात फारसा बदल झालेला दिसत नाही.मागील चार वर्षांत नेमकी कोणती विकास कामे मंजूर झाली आणि त्यातील किती विकासकामे पूर्ण झाली हे नागरिकांना कळणे गरजेचे असून पालिका आयुक्तांनी याबाबत सविस्तर आढावा घेऊन ही माहिती जनतेसाठी जाहीर करावी अशी मागणी निलेश पाटील यांनी केली आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!