ठाणे

हिंदूहृद्यसम्राट स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गोग्रासवाडी प्रभागात मोफत आधारकार्ड शिबीर

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : हिंदूहृद्यसम्राट स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गोग्रासवाडी प्रभागातील अमृतांजली सोसायटीत शिवसेना विभागीय कार्यालयात  मोफत आधारकार्ड शिबीराचे आयोजन केले होते.शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील यांनी सदर शिबीर भरविले होते.या शिबिरात शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी भेट देऊन पाटील यांच्या साजाकार्याचे कौतुक केले. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली सुकन्या समृद्धी योजना आणि आधार कार्ड-नवीन किंवा दुरुस्ती करण्यात आली.या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वीतेकरता उपविभागप्रमुख आत्माराम सावंत,मंगेश मोरे,शाखाप्रमुख समीर फाळके,आकाश पांडे, उपशाखाप्रमुख प्रशांत खामकर, वैभव खानोलकर यासह अनेक शिवसैनिकांनी अथक मेहनत घेतली. शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील यांनी कोरोना काळात जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले.तर पाटील यांच्या समाजकार्याची दाखल घेत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांनीहि त्यांचे कौतुक केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!