ठाणे

१० महिन्याच्या प्रतीक्षेनंतर डोंबिवली रेल्वेस्थानक पुन्हा प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजणार…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना काळात २२ मार्च २०२० रोजी ट्रेन बंद केल्याने दोन तर तीन महिने रेल्वे स्थानकात शुकशुकाट होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२० नंतर सरकारी कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी,डॉक्टर्स आणि परिचारिका यांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली.काही दिवसांनी फक्त महिलांना ट्रेनमधून प्रवास करण्यास परवनगी देण्यात आली.मात्र सर्व सामान्य जनतेसाठी लोकलचे दरवाजे कधी उघडणार असा प्रश्न पडला होता. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करत १ फेब्रेवारीपासून सर्व प्रवाश्यांसाठी लोकल सुरु करण्याच्या निर्णय घेतला.त्यामुळे मध्ये रेल्वे स्थानकातील सर्वात जास्त गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाणाऱ्या डोंबिवली रेल्वे स्थानक पुन्हा प्रवाश्यांच्या गर्दीने गजबजणार आहे.

      मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि सुशिक्षित – सांस्कृतिक माहेरघर असल्याने डोंबिवलीत नागरिकवस्ती मोठ्या प्रमाणात झाली. विशेष म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सरकारी तसेच खाजगी नोकरदारांच्या निवासासाठी प्रथम पसंतीचे ठिकाण म्हणून डोंबिवलीची नागरी भरभराट झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही अनेक पायाभूत सुविधा द्याव्या लागल्या. त्यामुळेच स्थानकाकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष देवून प्रवाश्यांच्या मागणीनुसार कामे केली. डोंबिवली लोकलमुळे होम प्लॅटफॉर्मसह पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे लांब-रुंद पादचारी उड्डाणपूलांचे बांधकाम केले. स्थानकात सरकते जिने, लिफ्ट असा सोयीमुळे महिला-जेष्ठ प्रवाश्यांना सुखकर झाले.अतिशय सुंदर असणारे आणि नेहमी प्रवाश्यांच्या गर्दीने फुललेल्या या डोंबिवली स्थानकाला कोरोनामुळे पुरते अस्ताव्यस्त करून सोडले. प्रत्येक उड्डाणपूलाची प्रवेशद्वारे लोखंडी पत्र्याने आणि बांबूच्या सहाय्याने बंद करण्यात आले होते.स्थानकाला जोडणारा पादचारी पुलाची दोन्ही टोके बंद केल्यामुळे सर्वत्र काळोखाचे साम्राज्य झाले होते.फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाश्यांना मोजके एका प्रवेशद्वारातून फलाटापर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

ठाणे

Advertisements

error: Content is protected !!