ठाणे

दिव्यात पुन्हा आॅपरेशन सलमा यशस्वी ; रेल्वे ट्रॅकवर भरकटलेल्या मतिमंद मुलीला जीवदान – दिव्यात गॅगमन, जीआरपी जवानांचे प्रसंगावधान

दिवा, दि. २ (बातमीदार) – नशीब बलवत्तर असेल तर कुणाच्या ना कुणाच्या मदतीने मृत्यूच्या दाढेतूनही सुखरूप बाहेर पडता येते. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा रेल्वे स्टेशनवर नुकतीच याची प्रचिती आली. मुंब्र्यातील घरातून वडिलांसाठी जेवण घेऊन बाहेर पडलेली मुलगी डोंबिवलीला जेवण देऊन आत्महत्येच्या विचाराने दिव्यातील जलद रेल्वेरुळावर ठाण्याच्या बाजूने चालत होती. त्यावेळी त्या २३ वर्षीय तरुणीला काम संपवून निघालेल्या 10 गॅगमनच्या  प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले.

सलमा मौजी असे या तरुणीचे नाव असून ती दिवा स्थानक परिसरात ट्रॅकवर भटकताना आढळली. समोरून रेल्वे येण्याआधीच तिला ट्रॅकवरून रुळावर काम करणाऱ्या गॅंगमननी चौकीत आणले.
वर्दळीच्या दिवा रेल्वे स्टेशनवर लाॅकडाऊननंतर आता पूर्वीसारखीच प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच रेल्वे रुळ ओलांडून चालण्याचे प्रकार घडत आहेत. रोजची सवय असलेले प्रवासी रेल्वे गाड्यांचा अंदाज घेऊन रुळ ओलांडतात. मात्र मतिमंद सलमा ही इकडेतिकडे न पाहताच रुळ ओलांडत असल्याचे गॅगमनच्या लक्षात आले. मधेच तिने थेट ट्रॅकमधूनच पायपीट सुरू केली होती. तिच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन गॅगमननी तातडीने मदतीसाठी पुढे धाव घेऊन तिला बाजूला नेण्यात आले. भर उन्हात तिने केलेल्या पायपीटमुळे ती प्रचंड थकली होती. दिवा रेल्वे पोलिसांनी तिला माणुसकीचे दर्शन घडवत पाणी व खाण्यास दिले.

त्यानंतर पोलिस मित्र आरती मुळीक- परब यांच्या मदतीने तरुणीला बोलते करून तिची ओळख पटवण्यात आली. त्याआधारे तिचे घर शोधून मतिमंद सलमाला सुखरूपपणे तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सोपवण्यात आले. यासाठी भिवंडीचे गॅंगमन विलास पालवे, विकास गभाले, प्रशांत राजगुरु, शक्तीवेल कुप्पुस्वामी, युवराज गाटवे, मनीकमं सुभ्रमनी, मुकादम, रामेश्वर सैनी, सुनिल शेखर, ब्रीज  किशोर यादव, मोनित नाईक, ज्यु. इंजिनियर, चेतन ठोंबर या दहा जणांचे तर रेल्वे जीआरपी पोलिस हवालदार विलास परब, कौंस्टेबल नितिन सरवदे व पोलिस मित्र आरती मुळीक परब यांनी तीन ते चार तास घेतलेल्या विशेष मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस मित्र आरती मुळीक- परब यांच्या कार्याचे कौतुक

पत्रकार व पोलिस मित्र आरती मुळीक-परब यांनी याआधीही बेपत्ता झालेल्या चार लहान मुलांना तर एका आजीला त्यांच्या नातेवाईकांची भेट घडवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्यादिवशी आम्ही सर्वजण दुपारी 3 वाजता काम संपवून रुळावरुन चालत घरी निघालो होते. तेव्हा ही सलमा नावाची मुलगी ठाण्याबाजूच्या जलद रुळावरुन रडत चालली होती. तिला पाहताच आम्ही तिला थांबवून विचारले कुठे चाललीस.. ती बोलायलाच तयार नव्हती. मग तीला मी म्हटले चल तुला तिकिट काढून देतो. मग तू ट्रेनने जा.. असं सांगून तिला रेल्वे पोलीसांच्या ताब्यात दिले. 

मनीकमं सुभ्रमनी, गॅंगमन मुकादम.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!