ठाणे

नळ कनेक्शन बाबत दिवा शहरासाठी स्वतंत्र विशेष अभय योजना सुरू करा! भाजपचे निलेश पाटील यांची मागणी!

दिवा:-दिवा शहरातील नागरिकांसाठी पालिका प्रशासनाने विशेष अभय योजना राबवून जास्तीतजास्त रहिवाशांना नळ कनेक्शन द्यावीत अशी मागणी भाजपचे निलेश पाटील यांनी पालिकेकडे केली आहे.

नागरिकांना कायमस्वरूपी नळ कनेक्शन मिळाल्यास सतत तोडल्या जाणाऱ्या कनेक्शन पासून सुटका होऊन नागरिकांची पाणी समस्या दूर होईल व पाणीपट्टीमुळे पालिकेच्या तिजोरीत देखील भर पडेल अशी भूमिका भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी केली आहे.

दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्या अनेक वेळा भेडसावत असते,काही ठिकाणी केवळ अधिकृत नळ जोडणी मिळत नसल्याने नागरिकांना तोडल्या जाणाऱ्या पाईपलाईन मुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.नागरिक पाणीपट्टी भरण्यास तयार असताना सुद्धा केवळ अधिकृत नळ जोडणी मिळत नसल्याने नागरिकांनी पाणी समस्येचा सामना करावा लागतो.दिव्यातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने दिवा शहरासाठी स्वतंत्र अभय योजना राबवावी अशी मागणी भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.दिवा शहरातील अनेक भागात अद्याप जलवाहिनी ची कामे पूर्णत्वास गेली नसल्याने देखील नागरिकांना पाणी समस्येचा त्रास सहन करावा लागतो. येथील नागरिक टँकर व फिल्टर पाणी विकत घेण्यासाठी खर्च करत असतील व त्याचा नाहक भुर्दंड या नागरिकांना पडत असेल तर पालिका प्रशासनाने येथील नागरिकांना इमारती व चाळी नुसार विशेष अभय योजनेच्या माध्यमातून पाणी कनेक्शन द्यावीत यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही,नागरिकांची पाणी समस्या सुटेल आणि पालिका प्रशासनाला देखील पाणीपट्टी स्वरूपात कर मिळेल असे मत भाजपचे निलेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!