ठाणे

मनसेच्या हळदीकुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“लकी ड्रॉ”च्या माध्यमातून “सोन्याच्या नथ”च्या मानकरी ठरल्या सुविधा दाभोलकर

जिल्हा संघटक तथा मा. नगरसेवक संदीप लकडे व त्यांच्या पत्नी पल्लवी लकडे यांनी केले हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

अंबरनाथ दि. ०४ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धमान नगर शाखेच्या वतीने “हळदीकुंकू समारंभ” मंगळवारी अंबरनाथ पूर्वेकडील मनसेचे जिल्हा संघटक तथा माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे जिल्हा संघटक तथा माजी नगरसेवक संदीप लकडे व त्यांच्या पत्नी पल्लवी लकडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा पार्श्वभूमीवर सर्व महिला घरात बसून कंटाळे होते, त्यामुळे महिलांना बाहेर येऊन थोडी मज्जा करता यावी त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असे आयोजकांनी सांगितले.         

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक अपर्णा कुणाल भोईर, सुप्रिया देसाई, संघजा मेश्राम, वनिता वाघ, ममता घावरे, मयुरी शेट्ये, रेश्मा पाठारे, प्राची पवार यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. या हळदीकुंकू समारंभात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना पल्लवी लकडे व संदीप लकडे यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले. तर “लकी ड्रॉ” च्या माध्यमातून ११ महिलांना पैठणी देण्यात आली, तर सुविधा दाभोलकर हे “सोन्याच्या नथ” च्या मानकरी ठरल्या.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!