ठाणे

खोणी-वडवली ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा… सरपंचपदी वंदना ठोंबरे

डोंबिवली ( शंकर जाधव )   खोणी-वडवली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी अखेर शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी होऊन शिवसेनेने भगवा फडकवला. खोणी-वडवली ग्रामपंचायात निवडणुकीत एकूण ११ उमेदवार विजयी झाले होते. तीन पॅनलच्या माध्यमातून २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेनाप्रणीत पॅनलने ११ उमेदवार उभे केले होते. त्यामधून ६  उमेदवार विजयी झाले. भाजपाप्रणीत पॅनलने ९ उमेदवार उभे केले होते त्यामधून २ उमेदवार विजयी झाले. तर मनसेप्रणीत पॅनलने उभे केलेले ३ उमेदवार विजयी झाले. त्यामुळे शिवसेना ६ , मनसे ३ आणि भाजपा २ अशी विजयी उमेदवारांची संख्या आहे.परंतु शिवसेनाप्रणीत पॅनलच्या एका उमेदवारांने बंड केल्याने शिवसेनेकडे विजयी उमेदवारांची संख्या ५ राहिल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी लागणारा ६ चा आकडा गाठता येत नसल्याने सरपंच निवडणूक अटीतटीची होणार अशी चर्चा पंचक्रोशीत सुरु झाली होती.

रविवारी सरपंचपदाची निवडणूक होती परंतु विजयी उमेदवार वेळेत हजर न राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक सोमवारी होईल असे जाहीर केले. सोमवारी पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत पॅनलचे ५  विजयी उमेदवार, मनसेप्रणीत पॅनलने 3 उमेदवार आणि बंड केलेला १ उमेदवार अशा ९  उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत भाग घेतला. भाजपाप्रणीत पॅनलच्या २ विजयी उमेदवारांनी तटस्थ भूमिका बजावली.तर बंड केलेल्या उमेदवाराने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या प्रत्यक्ष निवडणूकीमध्ये ५ विरुद्ध ३ मतांनी शिवसेनेच्या वंदना ठोंबरे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानी जाहीर केले. नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला खोणी गावातून सरपंचपदाची मोठी भेट मिळाल्याने शिवसैनिकांनी जल्लोष केला.

हा विजय सर्व लोकांचा आहे. खोणी ग्रामपंचायतीकडे सर्व पंचक्रोशीतील नेत्यांचे लक्ष लागले होते. हा विजय म्हणजे शिवसेनेवर तसेच उमेदवारांवर असलेला लोकांचा विश्वास आहे. या विजयाचे शिल्पकार आमचे कार्यकर्ते आहेत असे गौरोद्गार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी काढले. येणाऱ्या महापालिका निवडणुकीतसुद्धा शिवसेनेचाच भगवा फडकेल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!