महाराष्ट्र

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील नुतनीकृत नियोजन सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक, दि. 10  : विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून या नुतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन व नियोजन सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आज विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या उद्घाटनास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे, दिलीप बोरसे, नितीन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून नियोजन सभागृहाच्या बळकटीकरणासाठी एक कोटी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या अनुषंगाने नियोजन सभागृहात 200 व्यक्ती बसतील अशा स्वरूपाची आसन व्यवस्था करण्यात आली असून मुख्य व्यासपीठावरील बैठक व्यवस्था व पोडियम नव्याने तयार करण्यात आले आहे. तसेच सभागृहात सादरीकरणासाठी एकूण आठ दूरचित्रवाणी संच, नवीन श्रवण यंत्रणा, मध्यवर्ती वातानुकुलीत यंत्रणा सभागृ‍हात बसविण्यात येऊन विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहाचे अद्ययावतीकरण व सुशोभिकरण करण्यात आले आहे.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!