ठाणे

इंधन दरवाढी विरोधात तहसील कार्यालयावर मनसे चा भव्य मोर्चा


कल्याण : लॉकडाऊन काळात नागरिकांना व्यवसाय व नोकरी साठी अनेक अडचणी आल्या.कोणतंही उत्पन्नाचं साधन नसताना महावितरणने तर वीज बिलाची भरमसाठ रक्कम वाढवून जनतेला शॉक दिला.हे कमी काय म्हणून केंद्र सरकारने मागील अनेक वर्षांचा इंधन दरवाढीचा उच्चांक केला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढ होताच आंदोलन करणारी भाजप त्यांच्या कारकिर्दीत मात्र प्रचंड प्रमाणात इंधन दरवाढ होताना मूग गिळून गप्प बसली आहे असा आरोप होत आहे.इंधन दरवाढ होत असताना त्याची झळ घरगुती गॅस,एसटी भाडेवाढ व इतर वाहतुकीच्या साधनांवर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना या भाववाढीचा त्रास सहन करावा लागतो.

मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज बिल,इंधन दरवाढ व इतर समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत आहे.इंधन दरवाढीविरोधात मनसे तर्फे आज कल्याणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालय या दरम्यान मोर्चा काढण्यात आला.कल्याण तहसीलदार दीपक अगडे यांना मनसेच्या शिष्टमंडळाने इंधन दरवाढी विरोधातील निवेदन दिले.तहसीलदार दीपक अगडे यांनी निवेदन स्वीकारून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.वीजबिल व इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कल्याण-डोंबिवली येथील मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे गणवेष परिधान केला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर,इरफान शेख,उल्हास भोईर,कौस्तुभ देसाई,उर्मिला तांबे,स्वाती कदम,शीतल विखणकर, विनोद केणे, राजन शितोळे,अनंता गायकवाड, सुनंदा कोट,मनोज घरत,प्रकाश भोईर,दीपिका पेडणेकर, मंदाताई पाटील,सरोज पाटील,सुनीता शेलार,तृप्ती भोईर,अरुण जांभळे, कल्याण-डोंबिवली परिसरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!