ठाणे

जीवे मारण्याच्या धमकवणाऱ्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करा – भाजपचे उपाध्यक्ष निलेश पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार

पालिका कर्मचारी हे लोकांचे सेवक आहेत,धमकी देऊन भाईगिरी करण्यासाठी नाहीत, लोकांचा संताप!


दिवा:-दिव्यात हॉस्पिटल साठी राखीव असणाऱ्या जागेवर रुग्णालय व्हावे अशी मागणी भाजपने केल्याने सदर मागणी न रचलेल्या दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त महेश आहेर यांनी भाजप पदाधिकारी यांना धमकविण्यास सुरवात केली असून मला स्वतः फोन वरून धमकी दिली असल्याची तक्रार भाजपचे निलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ज्यांना लोकसेवक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ते भाईगिरी करण्याची भाषा करत असतील तर अशा सरकारी नोकरांवर प्रथम कारवाई करावी अशी मागणी आता या प्रकरणानंतर नागरिक करू लागले आहेत.

निलेश पाटील हे दिवा शहरात भाजपच्या माध्यमातून अनेक सामाजिक  प्रश्नांवर आवाज उठवत असतात.त्यांनी नेहमीच दिवा शहरातील नागरी प्रश्नांवर आवाज उठवताना वेळ प्रसंगी सत्ताधारी बरोबर संघर्ष केला आहे.दिव्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने निलेश पाटील व दिवा भाजपचे सर्व सहकारी यांनी दिव्यात रुग्णालय व्हावे व त्यासाठी आरक्षित असणारा भूखंड ताब्यात घ्यावा अशी मागणी लावून धरली.

याबाबत अतिक्रमण उपयुक्त बोरूपल्ले व दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे तक्रार केली.मात्र महेश आहेर यांनी संबंधित ठिकाणी कारवाई करण्या ऐवजी निलेश पाटील यांना व्हॉटस ऍप कॉल करून खोटे गुन्हे दाखल करण्याची व राहती घरे तोडण्याची धमकी दिली. त्याच बरोबर माझ्या नादाला लागू नका,मी मुंब्रा येथे अनेकांना सरळ केले आहे अशीही धमकी महेश आहेर यांनी दिली असल्याचे निलेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.महेश आहेर यांनी खोटा गुन्हा आपल्यावर दाखल केल्याने त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका आहे असेही पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!