गुन्हे वृत्त

घाटकोपरमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला चार तृतीय पंथीयांची मारहाण.

मुंबई ता १७, संतोष पडवळ : मुंबईतील घाटकोपरमध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस  कर्मचाऱ्याला चार तृतीयपंथीयांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.घाटकोपरमध्ये चार तृतीय पंथीयांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लवली करण पाटील, विकी रामदास कांबळे, तनू राज ठाकूर, जेबा जयंत शेख अशी या चार  तृतीय पंथीची नावे आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकणी पंतनगर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

वाहतुक विभागात कार्यरत असणारे पोलीस शिपाई विनोद बाबुराव सोनवणे हे घाटकोपर येथील छेडानगर सब वे येथे कर्तव्यावर होते. त्यावेळी एका रिक्षातून 4 व्यक्ती प्रवास करताना त्यांनी पाहिले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे रिक्षाचालकांना नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सोनवणे यांनी कारवाईसाठी फोटो काढला होता.

त्यांनी ई चलन कारवाई करण्यासाठी रिक्षाचा फोटो काढला असता त्या वेळी रिक्षात बसलेल्या या चार तृतीयपंथीय रिक्षातून खाली उतरून सोनवणे यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर जोरदार बाचाबाची झाली आणि त्यांना शिवीगाळ केली. काही वेळाने या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. चारही तृतीयपंथीयांनी मिळून सोनवणे यांनी भर रस्त्यावर बेदम मारहाण केली.

एवढंच नाहीतर त्यांच्या युनिफॉर्मच्या शर्टची बटन तोडली तसंच लवली पाटील हिने सोनवणे यांच्या डोक्यावरील टोपी खाली पाडून त्यांचा वॉकी टॉकी तोडला.

अखेर या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी चारही तृतीयपंथीयांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात कलम 353,332,294,427,504,34  अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!